चंद्रपूर महानगरासह दुर्गापुरात पिल्लांसह अस्वलाचा मुक्त संचार

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर महानगरातील वार्डांमध्ये काही महिन्यापूर्वी घातलेला अस्वलाचा धुमाकूळ थांबताच आता दुर्गापुरात पिल्लांसह एका स्वराचा मुक्त संचार नुकताच बघायला मिळाला आहे सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये अस्वल आपल्या पिल्लांसह रात्रीच्या वेळी संचार करीत असताना चा व्हिडिओ समोर आला आहे यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने तातडीने पावले उचलून बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.
वाघांचा जिल्हा म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात वाघ व आता अस्वलाचाही धुमाकूळ पाहायला मिळत आहे.काल नऊ फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास चंद्रपूर महानगरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दुर्गापुरातील वेकोली कालोनीतील शक्ती नगरात दोन पिल्लांसह एका अस्वलाचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. रात्री एक वाजता च्या सुमारास दुर्गापुरातील शक्तीनगर वसाहतीत एक अस्वल पिल्लांसह भ्रमंती करताना आढळली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया वरती व्हायरल झाल्यानंतर दुर्गापूर परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. काही महिन्यापूर्वी चंद्रपूर महानगरातील लालपेठ, अंचलेश्वर मंदिर. भिवापूर वार्ड येथील सुपर मार्केट मध्ये अस्वलीने धुमाकूळ घातला होता. त्यांनतर आता दुर्गापुरातील शक्तीनगर वेकोली वसाहतीमध्ये 2 पिल्लांसमह अस्वलाचे नागरिकांना दर्शन होतं आहे. काल रात्री एक वाजताचे सुमारास अस्वल पिल्लांसह वसाहतीच्या मार्गाने भ्रमंती करताना आढळून आली. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.
मागील अनेक महिन्यांपासून चंद्रपुरात शहरात अस्वलाचा मुक्तसंचार आणि धुमाकूळ पहायला बघायला मिळत आहे. दुर्गापूर, ऊर्जानगर परिसरात काही महिन्यांपासून वाघांचा धुमाकूळ सुरूच असताना आता अस्वलाची शहरात एन्ट्री झाल्यामुळे दहशतीत भर पडली आहे. वन विभागाने तातडीने दुर्गापूर उर्जानगर परिसरात बंदोबस्त लावून नागरिकांच्या जीवाची रक्षा करावी अशी मागणी होऊ लागली आहे.
The post चंद्रपूर महानगरासह दुर्गापुरात पिल्लांसह अस्वलाचा मुक्त संचार appeared first on पुढारी.
from पुढारी https://ift.tt/VUTmz0J