जेएनपीए बंदरातून २८ लाखांचा मोरपीसांचा साठा केला जप्त

उरण; राजकुमार भगत : महसूल गुप्तचर संचालनायाने गुरूवारी जेएनपीए बंदरातून परदेशात तस्करी करून पाठविण्यात येणारी कोट्यावधी रूपये किंमतीची मोरपीसे जप्त केली आहेत. डीआरआयच्या सूत्रांनी सांगितले की, अवैध बाजारात जप्त केलेल्या साठ्याची किंमत 2.01 कोटी आहे. वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 अतर्गत तसेच विदेशी व्यापार महासंचालनालयाने अधिसूचित केलेल्या निर्यात धोरणा नुसार मोराच्या शेपटीच्या पंखांची व माेर पिसांची निर्यात प्रतिबंधित आहे.
मुंबई विभागीय विभागाच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) बुधवारी न्हावा शेवा बंदरात 28 लाख मोराच्या शेपटीच्या पिसांचा साठा जप्त केला. कॉयर डोअरमॅट्स म्हणून त्याची चीनमध्ये तस्करी केली जात होती.डीआरआयने त्याच्या स्कॅनरखाली निर्यात मालाच्या निर्यातदाराची चौकशी केली आणि बेकायदेशीर निर्यातीत त्याचा सहभाग असल्याचे त्याने कबूल केल्यावर त्याला अटक केली. त्याला शहर न्यायालयासमाेर हजर केले असता, त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आंतरराष्ट्रीय वन्यजीव तस्करी नेटवर्कशी या बेकायदा निर्यातीचा काही संबंध आहे का त्याच बराेबर चीनमध्ये मोराच्या शेपटीच्या पिसांची तस्करी कोणत्या उद्देशाने केली जात होती हे देखील डीआरआय कडून तपासून पाहीले जात आहे.
The post जेएनपीए बंदरातून २८ लाखांचा मोरपीसांचा साठा केला जप्त appeared first on पुढारी.
from पुढारी https://ift.tt/8J6VOcH